राज्यभरात एसटी बसस्थानकांवर १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत टोयोटा किर्लोस्कर मोटरसोबत महामंडळाचा सामंजस्यकरार करण्यात आला.
पालघर जिल्ह्यातील दापचरी येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय कृषी बाजाराच्या उभारणीला गती देण्यासाठी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली.
राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीपर्यंत बारमाही, सुरक्षित व सुलभ संपर्क सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महसूल व भूमी अभिलेख विभागामार्फत ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना – शेत सेतू : महापाणंद गतीशक्ती’ या विशेष अभियानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शुभारंभ करण्यात आला.
राज्यातील नद्यांचे संवर्धन व पुनरुज्जीवन करण्यासाठी ‘महाराष्ट्र नदी संवर्धन अभियान’ राबविण्यात येणार असून, आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक येथे राज्यस्तरीय कार्यशाळा व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
गणेश चतुर्थीच्या मंगलमय मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांचे मुंबईतील अधिकृत निवासस्थान ‘वर्षा’ येथे श्रीगणेशाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.